ध्यान सराव स्वस्थ शरीर:
मागे सांगितल्या प्रमाणे तीच क्रिया सुरु ठेवावी. श्वास आत घेऊन, तो रोखून धरून सोडावा. श्वास सोडल्यावर आपल्या शिरा ज्या प्राणायाम क्रियेने ताणलेल्या होत्या, त्या आता स्वस्थ होऊन रक्तप्रवाह मोकळा होत जातो. धमन्या आणि शिरा आकुंचन आणि प्रसारण या क्रिया घडल्याने त्यातील रक्त प्रवाह मोकळा होतो. रक्त पेशींना व्यायाम होऊन, रक्त अवरोध मुक्त होते. आपला प्राणायाम क्रियेने हा श्वास म्हणजे ऑक्सिजन हा मुबलक प्रमाणात रक्तात मिसळला जातो. आणि पर्यायाने हृदयावरील ताण कमी होतो. रक्ताभिसरण क्रिया शरीरात व्यवस्थित होते.
जसे व्यायाम करतांना शरीर फुलत जाते, शरीराचा आकार काहीसा वाढतो, याचे कारण शरीरातील प्रत्येक अवयवात ऑक्सिजन वाढतो आणि पर्यायाने तेथील मज्जातंतू स्थित स्नायूंचे आकारमान वाढते.
हाच प्रकार प्राणायाम करताना आपल्या शरीरात होतो. श्वास रोखून धरल्याने ऑक्सिजन शरीरात खेळता ठेवता येतो. पर्यायाने शिरांमध्ये ऑक्सिजन वाढवला जातो. या सर्व शिरा हृदयाला आराम व गती नियमित करण्यास मदत करतात. त्यामुळे शिरांमधील झडपा आकुंचन आणि प्रसारण या क्रियांमुळे उघडल्या जातात. रक्तपुरवठा योग्य प्रमाणात शरीरास होतो.
आता परत एकदा प्राणायाम क्रिया पाहू,
बसण्यासाठी शांत जागा पहावी. तिथे गोंगाट नसावा, त्यामुळे मन शांत राहण्यास मदत होते. प्रथम बाह्य विचारांची गर्दी कमी करावी. घरांमध्ये प्राणायाम करत असल्यास, भिंतीला पाठ सरळ टेकून बसावे. सुरुवातीस मनातील विचार जात नाहीत. हळूहळू विचार काढून टाकावेत. त्यासाठी लघु व दीर्घ श्वास घ्यावेत. श्वासावर लक्ष ठेवावं. आलटून पालटून या क्रिया कराव्यात.
मन स्थिर स्थितीत येताना आपल्याला जाणवते. मनातील विचार कमी व्हायला लागतात. मन अंतर्मनात स्थित प्रवेश करण्यासाठी तयार होऊ लागते. मन शांत होण्यासाठी एवढी स्थिती योग्य आहे.
श्वास आत घ्या, १, २, ३, ४, ५, ६, ७ ....... ......१५ अंक पर्यंत.
श्वास घेताना तो आपल्या नाभी पासून वर वर घेत डोक्यापर्यंत येईल, असे लक्ष ठेवावे. पूर्व तयारी असेल तर २० अंकापर्यंत घ्या. अन्यथा १५ अंकापर्यंत घ्यावा. ही क्रिया दोन्ही नाकपुड्यांनी करता येते.
आता ८ ते १० अंक मोजत हा श्वास रोखून धरावा, सुरुवातीला नाही जमल्यास ५ ते ७ अंकापर्यंत करा. सराव झाल्यावर पुढे ८ किंवा १० अंकापर्यंत रोखून धरा. ह्या क्रियेत मणक्यांच्या मध्य मज्जातंतू नलिका spinal cord वर ताण येतो, जेव्हा आपण डोक्यापर्यंत श्वास रोखून धरतो त्यावेळी हा ताण जाणवतो.
श्वास रोखून सोडल्या नंतर डोके जड वाटू लागते. हळूहळू श्वास खाली उतरत येतो. त्याचवेळी आपले मन एका भाव-शून्य स्थितीत यायला लागते. डोके जड होण्याची क्रिया महत्वाची आहे. जेव्हा श्वासाची कुंभक क्रिया केली जाते, तेव्हा मेंदूशी जोडणाऱ्या मज्जातंतू यांचा ताण वाढतो आणि जेव्हा तो कमी होतो तेव्हा मेंदू बधिर होतो. डोके जड झाल्यासारखे वाटू लागते. या काळात मेंदूचं बधिर आणि जड अवस्थेत गेल्याने, विचार नाहीसे होतात किंवा मेंदूची विचार करण्याची क्षमता मंदावते. येथे मेंदूची सारा सार विचार शक्ती कंपवत होते. विचार नष्ट झाल्याने डोके शांत होऊन मन स्थिर स्थितीत जाते आणि भाव शून्य स्थितीत विलीन होते.
जेव्हा spinal cord चे मज्जातंतू जे मेंदूशी जोडलेले असतात, त्या ठिकाणी आकुंचन आणि प्रसरण या क्रिया होतात. या मेंदूशी संबंधित असल्याने मज्जातंतू, जेव्हा प्राणायामाचा ताण कमी होतो, तेव्हा मेंदूला जोडलेले मज्जातंतू थोड्या कालावधी साठी nill appearance mode जातात.
या nill appearance कालावधी मध्ये, आपले विचार कमी होत जातात, सतत विचार घेऊन धावणारे मन शांत होतं जाते. पर्यायाने आपल्याला ध्यान क्रियेत प्रवेश करता येतो. वरील प्राणायाम नियमित केल्यास ध्यानस्थ होण्यास फार वेळ लागत नाही. ध्यानस्थ झाल्याने जी शांत चित्ताची अनुभूती येते ती केवळ अनुभवातून सांगता येईल.
या प्राणायामाचा आपल्याला मनशांती साठी उपयोग होतो. ध्यान प्रक्रियेची अनुभूती येत जाते. मनातले विचार कमी होण्यास मदत होते. जोपर्यंत. आपल्या मनातील विचार कमी होत नाहीत, तोपर्यंत मनशांती कशी लाभावी? या प्राणायामाचा उपयोग आपण शारीरिक दुखणे कमी करण्यासाठी पण करू शकतो.
पुन्हा तोच प्राणायाम करूयात, ज्याने आपले दुखणे कमी होऊ शकते.
श्वास आत घ्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10,.... .... .....15 अंक मोजून. ( मनाने डोक्यापर्यंत न्या )
आता घेतलेला श्वास 1, ते ८ अंक मोजेपर्यंत रोखून ठेवा. आणि श्वास सोडून द्या. शरीरातील सर्व शिरा ताणल्या जातील. सोडल्यानंतर डोके प्रथम जड अवस्थेत जाते. हाच डोक्याचा जडपणा , आपल्या मनाने ज्या ठिकाणी आपल्याला दुखते आहे, त्या ठिकाणी श्वास घ्यावा. हा मनाचा जडपणा दुखणाऱ्या जागेवर घेऊन या. तेथे काही क्षण रेंगाळत ठेवा. या क्रिया वारंवार केल्याने दुखणाऱ्या जागेवरील मज्जातंतू प्रभावित होतील, त्याचप्रमाणे दुखणाऱ्या भागातील शिरा स्वस्थ होऊन दुखणे कमी होत जाते.
वरील प्राणायाम थोडे शरीराला आराम देऊन पुन्हा करा, मध्ये थोडा विश्राम घ्या.
निष्कर्ष :
वरील प्राणायाम हा शरीरातील ताण आणि दुखणे कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. श्वास नियंत्रितरीत्या घेणे, रोखणे आणि सोडणे यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, मज्जातंतू सक्रिय होतात व स्नायूंना विश्रांती मिळते. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन शांत होते आणि मानसिक तणावही कमी होतो. या प्रक्रियेद्वारे शरीर व मन यांचा समतोल साधला जातो, ज्यामुळे दुखणाऱ्या भागातील वेदना हळूहळू कमी होत जातात. नियमित सरावाने आरोग्य सुधारते, मन स्थिर होते आणि शरीरात नवचैतन्य निर्माण होते. या क्रिया वारंवार केल्याने दुखणाऱ्या जागेवरील मज्जातंतू प्रभावित होतील, दुखणाऱ्या भागातील शिरा स्वस्थ होतात आणि दुखणे कमी होते.

0 टिप्पण्या