ध्यानाबद्दल ओशोंचा दृष्टिकोन: वासनेच्या पलीकडे जाण्याचा एक प्रयोग, वासना पार करून शून्यात जाण्याचे तत्व.
ओशो — एक व्यक्तिमत्त्व जो तत्त्वज्ञान, आध्यात्मिकता आणि सामाजिक सीमांच्या पलीकडे जाण्याच्या प्रवृत्तीमुळे चर्चेत आला. त्यांनी ध्यान म्हणजे केवळ डोळे मिटून बसणे नव्हे, डोळे मिटून जरी बसले तरी वासनामय मन स्वस्थ नसते. नाना प्रकारचे विचार आपल्या मनात सतत रेंगाळत असतात. या सगळ्याला ओलांडून आपण अंतर्गत चक्रांची ऊर्जा स्वच्छ करणे, वासनांवर विजय मिळवणे आणि हृदयचक्रामध्ये प्रवेश करून आत्मतत्त्वाशी संयोग साधणे असा दृष्टिकोन त्यांनी मांडला.
ओशोंची ध्यान संकल्पना
ओशोंसाठी ध्यान हा एक मुक्तीचा मार्ग होता — अशा इच्छांपासून मुक्त होण्याचा जो मानवाच्या मनात खोलवर रुजलेल्या असतात. "वासना" या शब्दाने अनेकांना संभ्रमात टाकले. कारण हे फक्त लैंगिक वासनांपुरते मर्यादित नव्हते. ओशोंच्या मते, "वासना" म्हणजे प्रत्येक तीव्र इच्छा — प्रसिद्धीची, शक्तीची, मोहाची, रागाची किंवा स्वतःस केंद्रस्थानी ठेवण्याची.
ते म्हणायचे की जोपर्यंत मन हे इच्छेने भरलेले असते, तोपर्यंत ध्यान अर्धवट असते. आणि ध्यान म्हणजे रिकामे होणे — "शून्य" होणे — जेव्हा मनाच्या प्रत्येक थरावरून इच्छा गळून पडते, तेव्हा खरं ध्यान सुरू होतं. म्हणजेच वासनेला बगल देऊन "शून्य" तत्वात विलीन होणे.
तीन चक्रांतून मुक्ती
योगशास्त्रानुसार शरीरात 'सात चक्र' असतात. ओशोंचा दृष्टिकोन स्पष्टपणे या चक्रांवर आधारित होता —या सात चक्रांपैकी विशेषतः प्रारंभिक तीन चक्रांवर त्यांचा मुळ फोकस होता.
१ मूलाधार चक्र : जे आपले अस्तित्व दर्शविते , भीती, मूळ तत्व गाभा
२ स्वाधिष्ठान चक्र : जे वासना, मोह, स्वार्थ, मोह-मायेचे ब्रम्हत्व
३ नाभी (मणिपूर) जे क्रोध, आकांक्षा आणि काही औंशी मायेचे ब्रह्मत्व.
हे तीन चक्र "वासनेचे केंद्र" म्हणून ओळखले जातात. ओशोंचा तर्क असा होता की, याच चक्रांमधून स्वेच्छेने आणि शुद्ध पद्धतीने वर गेले पाहिजे — म्हणजेच या इच्छांचा सामना करून त्यांना मागे टाकत पुढे गेलं पाहिजे. संतानी पण हेच सांगितले आहे, "भोगा आणि पुढे जा, त्याला पार करून जा" आणि शून्य भावात लीन व्हा.
वैयक्तिक प्रयोग विरुद्ध सार्वजनिक गोंधळ
ओशो यांचे प्रयोग जेव्हा वैयक्तिक शिष्यांसोबत खास ध्यान शिबिरांमध्ये चालवत होते तेव्हा त्याचा उद्देश सुस्पष्ट होता — अंतर्गत वासनांचे निर्मूलन. पण जेव्हा तेच प्रयोग खुले सभागृह, मैदानं, आणि प्रचाराच्या माध्यमातून मांडले गेले, तेव्हा त्यांचा अर्थ विकृत होऊ लागला. मूळ पाश्चात संस्कृती हि आधुनिक आहे, तेथे आधुनिक कोणत्याही कल्पनेला सहज चालना मिळते, त्यामुळे ओशोंच्या या अध्यात्मिक विषयाच्या उत्सुकतेणे पाश्च्यात आधुनिकतेला भुरळ पडली आणि आधुनिक कल्पनेचा वर्ग या विषयाकडे आकर्षित झाला. पण त्यामुळे ओशोंच्या मूळ तत्वाला तडा गेला, आणि सर्व जण भलत्याच प्रवाहात भरकटत गेले. त्यामुळे ओशोंच्या वासनेतून 'शून्यभाव' हा मूळ अर्थ तेथे बाजूला फेकला गेला.लोकांनी "वासनेपासून मुक्ती" ऐवजी "वासना मुक्त" अशा मार्गाचा भलता अर्थ घेतला. मुळात वासनेतून पार होऊन किंवा वासनेला बगल देत, 'शून्य' भावात विलीन व्हावे, हा ओशोंचा उद्देश होता, पण वासनेला चालना मिळाली आणि इथेच त्यांच्या तत्त्वज्ञानाची खिल्ली उडवली गेली. ओशोंचा संदेश होता — इच्छेच्या पलीकडे जा — पण लोक त्यांच्या इच्छांनाच ओशोंच्या नावावर वैध करू लागले.
वासना ही निव्वळ दुर्जनता नाही
ओशोंचा दृष्टिकोन निव्वळ नकारात्मक नव्हता. त्यांच्याच विचारसरणीनुसार इच्छा ही मानवाला पुढे नेणारी शक्ती असू शकते — पण ती अनियंत्रित झाली तरच बिघाड होतो. त्यांच्या ध्यानतंत्रांमध्ये "डायनॅमिक मेडिटेशन", "कुंडलिनी ध्यान", अशा पद्धती होत्या, ज्या शरीरातून वासना, आक्रोश आणि अंतर्गत आवेग बाहेर टाकण्याचे मार्ग होते.
हृदयचक्राचे प्रवेशद्वार
जेव्हा मन 'मूलाधार', 'स्वाधिष्ठान' आणि 'नाभीपासून' मुक्त होते — तेव्हा आपण हृदयचक्राच्या दिशेने जातो. पण या तीन चक्रामध्येच आपण सर्व अडकलेलो असतो, या चक्रांमधून बाहेर पडणारा विरळाच. या तीन चक्रात प्रबळ अश्या वासना दडलेल्या आहेत, जातुन बाहेर पडणे म्हणजे एक दिव्यच आहे. 'मी', 'मला', 'माझे' या भावात मूलाधार चक्र आहे. त्याच्यावरील दोन्ही चक्रात अति प्रबळ 'वासना" दडलेल्या आहेत, "माया", "ममता", "प्रेम", "काम-वासना," "भूक" या सर्वांना ओलांडून आपण हृदयचक्रात प्रवेश करतो. या तीनही चक्रातून मुक्त होऊन आपण हृदय चक्रात स्थिर व्हायचे असते.
म्हणून ओशोंनी वासनामुक्त होऊन, शून्य स्थितीत येण्यासाठी, वासनांचा आधार घेऊन त्या शमवून 'आध्यत्मिक शून्य' भावात येण्याचा प्रयत्न केला.ओशोंच्या मतानुसार, हे चक्र प्रेम, समजूत, स्वीकृती, आणि शांततेचे प्रतीक आहे. येथेच ध्यानाचे खरे रूप गवसते — अशा स्थितीत व्यक्ती स्वतःमध्ये रमेल, स्वतःच्या अस्तित्वाशी जोडेल.
भक्तांचा गोंधळ आणि संदेशाचा अपाय
सर्व ज्ञान योग्य शिष्यालाच पटते, असे म्हणतात. ओशोंचा संदेशही काहीशा अशाच स्थितीत फसला. आपले तत्व सर्वांना लागू पडेल असा त्यांचा कयास होता, पण त्यांच्या भक्तांनी त्यांचे विचार काही वेळा अर्धवट समजून घेतले. मूळ आध्यत्मिक गाभा समजून न घेतल्यामुळे, परिणामस्वरूप, ध्यान आणि वासनेचा मूळ संदेशच हरवला. हे फारच दुर्दैवाचे होते — ओशो यांची विचारसरणी ही वैयक्तिक साधनेसाठी होती, सार्वत्रिक विकृतीसाठी नव्हे. परंतु "जितक्या प्रकृती तितक्या विकृती" हा भाव न समजल्यामुळे, सरसकट शुद्ध भाव तेथे हरवला गेला. आणि सर्वजण वासने मध्ये गुरफटले.
आपल्या आध्यत्मिक शास्त्रात तन्मय भाव वाढीस लागावा आणि त्यातच लीन होण्यासाठी काही तत्वांचा उपयोग केला गेला, पण त्यांचा मूळ मुद्दा "अध्यात्मिक" आणि "शून्य भाव" यासाठीच होता, जो ओशोंचा मूळ मुद्दा होता.
परंतु हे काही प्रकृती आणि विकृती यात अडकलेल्यांना समजले नाही आणि भक्तांचा गोंधळ उडाला.
निष्कर्ष
ओशोंचा ध्यानातला दृष्टिकोन हा केवळ चमत्कारिक नव्हता, तर आंतरज्ञानाचा शोध होता. त्यांनी वासना म्हणजे आत्म्याचे आवरण मानले आणि त्यातून मुक्त होऊन आत्मतत्त्वाशी एकरूप होण्याचा मार्ग शोधला.
त्यांचा संदेश अद्यापही तितकाच प्रासंगिक आहे — कारण आजही आपण इच्छांनी भरलेले जग जगतो. 'ध्यान' हा त्या इच्छांचा सामना करून त्यांना पार करण्याचा मार्ग आहे — त्या इच्छांमध्ये बुडण्याचा नव्हे. ओशोंच्या विचारांना जर योग्य समजून घेतलं तर ते प्रत्येकाच्या आत्मिक प्रवासाला नवा आयाम देऊ शकतात.
FAQ : वारंवार विचारले जाणारे प्रश्न:
"वासनेतून ध्यानमग्न" हा ओशोंचा दृष्टिकोन बरोबर होता का ?

0 टिप्पण्या